विषय : शिष्यवृत्ती सराव परीक्षा २०१८-१९
रोटरी क्लब मालवण
तर्फे रविवार, दि. १०/०२/२०१९
रोजी टोपीवाला हाय. मालवण येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षा घेण्यात येणार आहे. हि परीक्षा इंग्रजी व मराठी या दोन्ही माध्यमातुन
घेण्यात येईल. परीक्षार्थींची नावे व परीक्षा शुल्क प्रती विद्यार्थी रु. ५०/- प्रमाणे लिमये
हॉस्पिटल, मालवण येथे दि. ८ फेब्रु. २०१९ पुर्वी जमा करावी. नाव नोंदणी
चे पत्र सादर करताना परिक्षार्थींचे नाव, शाळेचे नाव, इयत्ता, माध्यम व एकुण शुल्क या माहिती सहित जमा करावे.
दि. ८ फेब्रु. २०१९ नंतर नाव नोंदणी स्विकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
परीक्षेचे वेळापत्रक
स. १०.०० ते ११.३० : पहिला पेपर
स. १२.०० ते १.३० : दुसरा पेपर
सदर माहित्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी
आम्हांस सहकार्य करावे. शुक्रवार दि. १५/०२/२०१९ रोजी संध्याकाळी ५.००
वाजता http://rotarymalvan.blogspot.com
या लिंकवर परीक्षेचा निकाल घोषित करण्यात येईल. परीक्षेनंतर दुस-या दिवशी याच लिंकवर उत्तरपत्रिका देखील प्रसारीत करण्यात येतील.
Comments
Post a Comment